RamDas Swami‘s + Shashwad Babalgaon’s Writings;

भेटो कोणी येक नर । धेड महार चांभार । त्याचें राखावें अंतर । याचें नांव भजन ।।१।।
दुःख नेदावें कोणाला । उंच नीच जरी जाला । अंतरात्मा वोळखिला । तोचि जाणा सज्जन ।।२।।
मिळाला तो भक्त जाला । दोष मिळेना तयाला । देव प्रत्यक्ष कोपला । अहंभाव दुर्जन ।।३।।
राजी राखावे सकळ । बरेपण सर्व काळ । नित्य आनंदाची वेळ । काळ करी वंदन ।।४।।
© RamDas Swami


जय रघुनंदन । पूर्ण कृपाघन ।
वामांकी सीता । शोभतसे ॥
सव्य लक्षुमण । भरत शत्रुघन ।
सन्मुख मारूती । तो विलसे ॥
अंगद सूग्रीव । भक्त बिभीषण ।
जांबुवंत गुज । गर्जतसे ॥
नाम विशेष । पट्टाधीश ।
शश्वद् गुण । गर्जतसे ॥
© RamDas Swami
ब्रह्मचारे प्राणनाथा । त्रिभुवनी तुझी सत्ता । शश्वद् भेटी रघुनाथा । तुझे चरण लाधल्या ।।१।।
भूतमात्र तुझे कूळ । मूळमायेसी तूची मूळ । तुझेचि बल बा अतुळ । राम सुखे सुखावला ॥२॥
उत्पत्तिरूपेचि कर्ता । स्थितिरूपेचि धर्ता । संहारकारक हर्ता । तूचि येक महाभला ॥३॥
नाम घेतांचि पावसी । भक्त संकटे नाससी । ऐसा तू रामदासी । पूर्वपुण्ये लाभला ।।४।।
© RamDas Swami

Arti song
written by Ip Man Babalgaon
।। श्री आत्माराम चरणों शरणं प्रपध्ये ।।
।। श्रोतावक्ता श्री राम समर्थ ।।
त्री गुणी निर्गूणी अंजनी माता ।
काळ साकार काळ अवतार केसरी पिता ।
हरी हर ब्रह्मस्य अनुसुया माता ।
धन्य तो ब्रह्मांड अनंतस्य पिता ।।१।।
जय देव जय देव कालाग्नि रूपा ।
आरती ओवाळु काळ स्वरूपा ।।धृ॰।।
बहु अवतारी बहुता काळांचा ।
निराकारूपो काळ सकळांचा ।
जो युगान युगे आत्माराम आमुचा ।
टोण्ग्या म्हणे महिमा न बोलवे वाचा ।।२।।
रामावतार कृष्णावतार होउनि जात ।
परंतु दत्तावतार कलि होउनीर्हात ।
साक्षात सर्व देवांचा वरदान प्राप्त ।
पुण्यवंथ पुण्यशील निर्मळ एकांत ।।३।।
मुनि श्रेष्ठ वशिष्ठ रामी रामेष्टा ।
हरी – हर ब्रह्माधिक निस्वरूप कालांता ।
माझा संसार तुला लागला सदगुरुदाता ।
श्रेष्ट टोण्ग्या रूपी मि तुझा रामदूता ।।४।।
देवी देव रूप नाना विकारी ।
चरण मागतो होउनी भिकारी ।
टोण्ग्या रूपी मि तुझा निराकारी ।
रामदूत म्हणे शश्वद् साहकारी ।।५।।
© Shashwad Basavaraj Babalgaon
भीम भयानक रूप अद्भूत।
वज्रदेही दिसे जैसा पर्वत।
टवकारूनि नेत्र रोम थरथरित।
स्थिरता नाहीं चंचल जाला उद्दीत॥१॥
जयदेव जयदेव जय महारुद्रा।
आरत भेटीचें दीजे कपींद्रा॥धृ०॥
हुंकारूनि बळे गगनीं उडाला।
अकस्मात जानकीसी भेटला।
वन विध्वंसूनि अखया मारिला।
तत्क्षणें लंकेवरी चौताळला॥२॥
आटोपेना वानर हटवादी धीट।
पवाडला जाळूं पाहे त्रिकूट।
मिळोनि रजनीचर करती बोभाट।
धडाडिला वन्ही शिखा लांबट॥३॥
कडकडीत ज्वाला भडका विशाळ।
भुभु:कारे करुनि भोवीं लांगूळ।
थोर हलकल्लोळ पळती सकळ।
वोढवला वाटे प्रलयकाळ॥४॥
तृतीयभाग लंका होळी पैं केली।
जानकीची शुद्धि श्रीरामा नेली।
देखोनि आनंदे सेना गजबजली।
दूत शश्वद् दासा निज भेटी जाली॥५॥
© RamDas Swami
This site’s page content (Above Writings) is/are protected by US, Indian and International copyright laws. Unauthorized copy, reproduction, distribution and/or transmission is strictly prohibited. ~VIOLATORS MAY BE SUBJECT TO CIVIL LIABILITY OR CRIMINAL PENALTIES OR BOTH.
to know more about penalty, etc… PLEASE CLICK HERE